Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : भारतीय अर्थव्यवस्थेची पाचव्या क्रमावर झेप; ब्रिटनला मागे टाकले

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) गती मिळत असल्याचा खुलासा नुकताच करण्यात आला होता, यानुसार २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत व २०२२ च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे निष्पन्न झाले होते. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी १३.५ टक्के दरावर पोहचला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. परिणामी सध्या भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. ही सकारात्मक बाब आहे.

आनंदाची बातमी : भारतीय अर्थव्यवस्थेने घेतली भरारी; पहिल्या तिमाहीत जीडीपी दर १३.५ टक्क्यांवर

याअगोदर जागतिक नाणेनिधी संघटनेने भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आगेकूच करू शकते याबाबत अंदाज वर्तविला होता. आकडेवारीच्या आधारावर सध्या ब्लूमबर्गने हा अहवाल दिला आहे. सध्या ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचा शिरकाव झाला आहे याशिवाय झालेल्या राजकीय अस्थिरतेचा परिणाम देखील ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. सध्या भारताचा विकास दर ७ टक्के इतका निश्चित केला गेला असून, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत साध्य केलेला जीडीपी दर भारताच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारा ठरला आहे.

केंद्राच्या प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ; ‘इतके’ ट्रिलियनचे लक्ष्य गाठणार?

भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती हे नक्कीच कोरोनानंतरच्या आर्थिक नुकसानीवर मात केल्याचे सूचक आहे. यामुळे जगातील टॉप आर्थिक शक्तिशाली देशांच्या यादीत सामील होण्याचा मान भारताला प्राप्त झाला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.