Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांना अटक; चित्रपटगृहात गोंधळ घालणे भोवणार?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपट गृहात मोठा राडा करण्यात आला होता, प्रसंगी प्रेक्षकांना चित्रपट गृहाबाहेर हुसकावून लावण्यात आले होते. तसेच एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात होती. सदर चित्रपटावरील विरोध प्रदर्शन राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते, प्रसंगी मनसे कार्यकर्ते यावेळी जमले होते त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. नेमक्या याच प्रकरणी पोलिसांनी जितेन्द्र आव्हाड यांना अटक केल्याचे वृत्त आहे.

अजित पवारांनी नॉट रिचेबल असल्याचा स्वतःच केला खुलासा; म्हणाले…

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसांनी मला कळविले होते की तुम्हाला अटक करावी लागेल. हर हर महादेव या चित्रपटातून संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला गेला आहे. शिवाजी महाराजांची देखील बदनामी करण्यात येत असून त्यामुळे मला चित्रपटाचा विरोध केल्यामुळे कारागृहात राहावे लागत असेल तर मी राहील. याशिवाय जामिनासाठी देखील अर्ज करणार नाही, अशी भूमिका यावेळी आव्हाडांनी मांडली.

राज्यातील हे दोन प्रमुख नेते एकाच कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित राहणार; युतीच्या चर्चांना उधाण

नुकतेच आव्हाडांनी ट्विट करत सांगितले की, मी पोलीस स्टेशनला गेलो असता मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवण्यात आले होते. पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसून येत होता. वरून आदेश असल्यामुळे अटक करावी लागले असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे आव्हाड म्हणाले. आता मला फाशी जरी दिली तरी मी जे केलं नाही ते कबूल करणार नाही असे यावेळी ट्विट मध्ये आव्हाडांनी नमूद केले.

ब्रेकिंग : शिंदे गटात इनकमिंग सुरू होणार! हिवाळी अधिवेशनातच ठाकरे गट, काँग्रेस फुटणार

एकंदरतीच राज्याच्या राजकारणात एका नवीन प्रकरणाची भर जितेंद्र आव्हाडांच्या अटकेमुळे पडली असून, हे प्रकरण नेमक्या कुठल्या दिशेला वळते हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.