Take a fresh look at your lifestyle.

गौतम अदानींच्या नावे मोठा विक्रम; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी गरुडझेप घेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. यादीतील जेफ बेझोस व बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. सध्या अदानी यांच्या पुढे फक्त एलॉन मस्क आहेत. जर गौतम अदानी यांची अशीच घोडदौड सुरु राहल्यास ते अव्वल स्थानी देखील पोहचू शकतात. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५३.९ बिलियन डॉलर इतकी झाली आहे व एलॉन मस्क यांची संपत्ती २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे.

अखेर ठाण्याची बुलंद तोफ शिंदे गडावर

या यादीत दुसरे भारतीय उद्योपती मुकेश अंबानी हे देखील असून त्यांनी देखील नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे. भारतातील अदानी समूह हा तिसरा सर्वात मोठा उद्योग समूह असून या अंतर्गत बंदरे, खाणकाम, ऊर्जा, संसाधने, संरक्षण, गॅस, विमानतळे व एरोस्पेस इत्यादी उद्योग आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.