Take a fresh look at your lifestyle.

जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा! ‘या’ घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laundering Case) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Actress Jacqueline Farnandez) मोठा दिसाला मिळाला आहे. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

TCS कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; नियमाची पायमल्ली केल्यास होणार कारवाई

गेल्या महिनाभरापासून जॅकलिनची याप्रकरणी ईडीकडून (ED) चौकशी सुरू होती. याप्रकरणी ईडीने जॅकलिनला आरोपी करत कोर्टात पुरवणी आरोपपत्रदेखील दाखल केले होते. अशामध्ये या प्रकरणाची आज सुनावणी झाली आणि कोर्टाने तिला अंतरिम जामीन दिला.

शेअर बाजाराला मोठा फटका; मार्केट उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी आपटला

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरशी संबंधित असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन चांगलीच अडकली होती. याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी तिला अनेकदा समन्स बजावले होते. ईडीकडून सातत्याने जॅकलिनची चौकशी सुरू होती. अशातच या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीसाठी हजर झाली आणि कोर्टाने तिला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जॅकलिनला तूर्तास दिसाला मिळाला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.