Take a fresh look at your lifestyle.

खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले; आता केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. दररोजच्या जीवनातील किचनचा अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाच्या किंमतीसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ऐन होळीसारख्या सणाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच, खाद्यतेलाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमतींनी किचनचं बजेट कोलमडलं आहे.

खाद्य तेलाच्या या वाढत्या किंमतींबाबत आता सरकार देखील ऍक्शन मोडवर आहे. तेलाच्या किंमती कमी व्हाव्यात यासाठी अनेक राज्यांसोबत बैठका सुरु आहेत. याविषयी, सरकारने तेल उत्पादक तसेच निर्यातदारांसोबतही चर्चा केली आहे. यासाठी केंद्राने राज्यांना अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये कृत्रिम वाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. साठेबाजी आणि किमतीत वाढ करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि जिल्हा स्तरावर पाळत ठेवण्याचे निर्देश त्यांनी राज्यांना दिले.

मागील आठवडाभरात रिफाइंड तेलाच्या दरात प्रतिलिटर 25 रुपये इतकी तर बदामाच्या किमतीत 20 ते 30 रुपये किलोने वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती येत्या काही दिवसांत नवा उच्चांक गाठू शकतात.

रशिया-युक्रेन युद्धामुळे किंमती वाढल्या

रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेल, पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या पुरवठ्याला तिहेरी धक्का बसला आहे. युक्रेनमधून सूर्यफुलाच्या पुरवठ्यावर दबाव आल्याने इंडोनेशियातील निर्यात धोरणावर आणखी परिणाम झाला आहे. त्यामुळे पामतेल आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय, यामुळे दक्षिण अमेरिकेतील पिकांच्या नुकसानीची चिंता वाढली आहे, ज्यामुळे सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

येत्या काही दिवसांत दर आणखी वाढणार

अवघ्या महिनाभरात भाव 125 रुपयांवरून 170-180 रुपयांवर पोहोचले आहेत. मे किंवा जूनमध्ये यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. किमतीत आणखी वाढ होण्याचे प्रमाण अनेक घटकांवर अवलंबून असेल. पण ती थोडीशी वाढ नक्कीच होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.