Take a fresh look at your lifestyle.

आमदाराच्या कारने 22 जणांना चिरडलं, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

भुवनेश्वर – ओडिशा राज्यातून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. येथील एका आमदाराच्या कारने तब्बल 22 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात एकूण 22 जण जखमी झाले असून यामध्ये 7 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील खुरदा जिल्ह्यातील बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे काही समर्थक कार्यालयाच्या बाहेर जमले होते. यावेळी चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांची कार जमलेल्या लोकांच्या अंगावर भरधाव वेगात आली. काही समजण्याच्या आत या कारने तब्बल 22 जणांना चिरडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/SumitOdisha/status/1502535193017688069?s=20&t=XVu2L03Eulg8gxdD0eNW4A

दरम्यान, कारने लोकांना चेंगरल्यामुळे संतप्त जमावाने आमदार प्रशांत जगदेव यांना लाथा बुक्यांनी तुंबळ मारहाण केली आहे. या मारहाणीत आमदार प्रशांत जगदेव हे गंभीरित्या जखमी झाले आहे. त्याचबरोबर या अपघातातील जखमींना देखील स्थानिक नागरिकांनी तातडीनं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. या घटनेत कोणीही मृत्यूमुखी पडले नसून घटनेची चौकशी केली जात असल्याचं खुर्दा पोलिस अधीक्षक एसपी अलेख चंद्र पाधी यांनी सांगितलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.