Take a fresh look at your lifestyle.

भाजपची ‘मिशन २०२४’ करिता मोर्चेबांधणीला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे वारे वाहत असताना भाजप पक्ष राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांचे नियोजन करण्यात व्यस्त आहे . भाजपने मिशन २०२४ अंतर्गत लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून महाराष्ट्रातील काही नेत्यांवर याकरिता मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. इथे विशेष बाब म्हणजे ज्यांची पक्षासोबत अंतर्गत नाराजी आहे अशी ज्यांच्याबद्दल नेहमी चर्चा होत असते अश्या काही नेत्यांवरच भाजपने राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्रातील ४ नेत्यांवर सध्या भाजपने मिशन २०२४ लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली असून त्यांना प्रभारी व सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : ‘या’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर मोठा बदल

महाराष्ट्रातून सध्या विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांच्यावर विविध राज्यातील प्रभारी तसेच सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. डाव्या पक्षांचे प्राबल्य असलेल्या केरळच्या प्रभारीपदी प्रकाश जावडेकर तसेच मध्य तर प्रदेशच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी पंकजा मुंडे यांना देण्यात आली आहे. याशिवाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना राजस्थान राज्याच्या सहप्रभारी पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी असेल.

ऑनलाइन बँकिंग फ्रॉड : ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी ही बातमी अवश्य वाचा

एकंदरीतच या यादीत काही अशा नेत्यांची नावे आहे ज्यांना पक्षाकडून सध्या तरी कुठलेही मंत्रिपद देण्यात आले नाही परंतु राष्ट्रीय नेतृत्वाचा भार सोपवत पक्षाने अंतर्गत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे. आतापर्यंत भाजपने एकूण १५ राज्याकरिता प्रभारी व सहप्रभारी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.