Take a fresh look at your lifestyle.

भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? ‘या’ 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपामध्ये (BJP) संघटनात्मक बदलांच्या हलचालींना वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राज्य मंत्रिमंडळातील जागा निश्चित आहे. त्यामुळे भाजपातील ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्वानुसार त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. चंद्रकांत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून 3 नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुखच शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!

सत्ताबदलानंतर भाजपाचं पुढील लक्ष्य हे मुंबई महापालिका जिंकणे हे आहे. राज्य भाजपाचा अध्यक्षही मुंबईतील द्यायचा ठरल्यास आशिष शेलार (Ashish Shelar) हे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. शेलार हे मुंबईतील आक्रमक भाजपा नेते आहेत. ते यापूर्वी मुंबई भाजपा अध्यक्ष तसंच फडणवीस सरकारमध्ये मंत्री देखील होते.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये मध्यरात्री खलबतं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातून राम शिंदे (Ram Shinde) यांचे नाव चर्चेत आहे. नगर जिल्ह्यातील शिंदे देखील फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. नुकतीच विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर विदर्भातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे देखील नाव भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.’पक्षानं मला आजवर भरभरून दिलं आहे. यापुढेही पक्षाचा जो आदेश असेल तो स्विकारेन’ असं बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर बोलताना जाहीर केले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.