Take a fresh look at your lifestyle.

भररस्त्यात BJP नेत्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; हल्लेखोर फरार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) गुन्हेगार सुसाट झाले आहेत. ज्याचा अंदाज जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर दिसून आला आहे. कारण गाझीपूर पोलीस स्टेशन (Ghazipur police station) परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात भाजप नेते जितू चौधरी (BJP leader Jitu Chaudhary) यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते जितू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. जितू चौधरी हे भाजपचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते.

मुसळधार पावसामुळे 400 लोकांचा मृत्यू; शोध आणि बचाव कार्य वेगात

पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, जितू चौधरी याचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. हत्येमागे व्यवहाराचा वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी 42 वर्षीय जितू चौधरी यांच्यावर बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आता बँक खात्यात पैसे नसतील तरी काढता येतील 10,000 रुपये; जाणून घ्या सरकारची नवीन योजना

संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास गाझीपूर पोलीस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. ज्यामध्ये 42 वर्षीय जितेंद्र उर्फ ​​जीतू चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.