Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाविषयी भाजपने विधिमंडळ अधिवेशनात केली ‘ही’ मागणी

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून प्रेक्षक तोंड भरून या सिनेमाचं कौतुक करताना बघायला मिळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये काही प्रेक्षक भावुक होत असल्याचं देखील दिसत आहे.

कौतुकास्पद म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवरच गाजत नाहीय तर राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रात सध्या विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. “द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे.परंतू ही परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणिवपूर्वक आवाज बंद करणे, प्रेक्षकांना चित्रपट बघण्यास विरोध करणे असे विविध प्रकार सुरू आहेत. त्यामुळे चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपतर्फे विधिमंडळ अधिववेशनात करण्यात आली.

काश्मीरी पंडितांविषयी बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा”, अशी मागणीच भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला प्रसंग ३० वर्ष जुना असून सध्या कमालीचा चर्चेत आहे. दरम्यान, हा प्रसंग फक्त ३० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर नसून ३० वर्षात काय घडू शकतं याचा प्रत्यय आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय, IMDB रेटिंग्जमध्येही अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ अव्वल ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.