Take a fresh look at your lifestyle.

भाजपचा सरकार स्थापनेचा दावा; सोमवारी शपथविधी होणार? वरिष्ठ नेत्यांकडून महत्त्वाची माहिती

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रात सध्या राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात याच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अजूनही शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आता एकनाथ शिंदेंचा नेमका प्लॅन काय आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार! शिंदे काय निवडणार? भाजपची ऑफर की उद्धव ठाकरेंची साद?

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे.

दादा भुसे आणि संजय राठोड हॉटेलमध्ये दाखल होताच हे पत्र घेऊन जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र; आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ठाकरे सरकारचा खेळ संपला! एकनाथ शिंदे यांच्या गटाचं पत्र समोर, तब्बल ‘इतक्या’ आमदारांच्या सह्या

आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात उतरल्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.