Take a fresh look at your lifestyle.

Trending बॉर्डर ओलांडून दररोज भारतात यायचा बांगलादेशमधील मुलगा; कारण जाणून हादरून जाल

इमाम हुसेन असं या मुलाचं नाव असून तो वैध कागदपत्रांशिवाय भारतात दाखल झाला होता. लष्कराच्या चौकशीदरम्यान मुलाने भारतात येण्याचं अतिशय विचित्र कारण सांगितलं.

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – काही घटना अशा असतात ज्यावर माणूस सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाही. त्रिपुराच्या सिपाहिजाला जिल्ह्यात एका मुलाला लष्कराच्या जवानांनी पकडल्याची अशीच एक घटना घडली आहे. इमाम हुसेन असं या मुलाचं नाव असून तो वैध कागदपत्रांशिवाय भारतात दाखल झाला होता. लष्कराच्या चौकशीदरम्यान मुलाने भारतात येण्याचं अतिशय विचित्र कारण सांगितलं.

तुमच्या शहराचे असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

तुम्ही सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटात तो ज्या पद्धतीने सीमेवरील काटेरी तारांखालून पाकिस्तानात प्रवेश करतो, त्याच पद्धतीने हा मुलगा तारांच्या मध्ये असलेल्या गॅपमधून बाहेर येत एका नदीत पोहत भारतात यायचा. विशेष म्हणजे चौकशीत मुलानेच सांगितलं की, तो इथे पहिल्यांदा आला नसून हे त्याचं रोजचं काम आहे.

बांगलादेशातील रहिवासी इमान हुसैन सांगतो की, तो रोज भारतात येत असे. त्यासाठी तो तारांमधील गॅपमधून बाहेर पडून छोट्या नदीपर्यंत पोहोचायचा आणि त्यात पोहून त्रिपुरातील कलामचौरा गावात यायचा. सीमा सुरक्षा दलानेही त्याला इथून पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीटीआयशी बोलताना सोनमुरा एसडीपीओ यांनी सांगितलं की, त्याला न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान मुलाने भारतात येण्याचं दिलेलं कारण अधिकच रंजक आहे.

अप्लाय करुन देखील PAN Card आलं नाहीय का? असं चेक करा स्टेटस

पोलिसांनी इमानची चौकशी केली असता तो बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समोर आले. त्याने स्वतः सांगितलं की तो बांगलादेशातून रोज पोहून भारतात त्याच्या आवडत्या चॉकलेटची खरेदी करण्यासाठी येत असे. पोलिसांना त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळलं नाही. फक्त कागदपत्रांशिवाय भारतात आल्याने त्याला पकडण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. स्थानिक दुकानदारानेही कबूल केलं की केवळ हाच मुलगा नाही तर इतर मुलेही चॉकलेट आणि इतर वस्तू घेण्यासाठी नदी पार करून भारतात येतात.

धक्कादायक… सूर्यावर स्फोट; पृथ्वीवर ब्लॅक आऊटची भीती

 

Leave A Reply

Your email address will not be published.