Take a fresh look at your lifestyle.

‘कोणालाच आरक्षण न देण्याची ब्राम्हण संघटनेची मागणी; शरद पवारांनी दिलं सडेतोड उत्तर

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रात सध्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत. मात्र, जातीय राजकारण तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील राजकारण तापलेलं आहे. बऱ्याचदा ब्राह्मण विरोधी राजकारण करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) हेच जबाबदार आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा ब्राह्मण विरोधी झाल्याचं चित्रही दिसत होतं. परिणामी शरद पवारांनी पुढाकार घेत ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार, 20 ब्राह्मण संघटनांचे 60 प्रतिनिधी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी महत्त्वाच्या तीन मुद्द्यांवर चर्चा केली गेली.

BREAKING | महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेलसह गॅसदरात मोठी कपात

बैठकीनंतर काय म्हणालेत अखिल भारतीय ब्राम्हण संघाचे गोविंद कुलकर्णी?

राष्ट्रवादीचे अनेक नेते जातीवाचक बोलतात असं या बैठकीदरम्यान पवारांना सांगण्यात आलं. यावर आम्ही त्यांना समज देऊ असं पवारांकडून सांगण्यात आलं. ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगता यायला हवं, ही प्रमुख मागणी आहे. ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी देखील करण्यात आली आहे.

Ration Card ‘या’ 4 कारणांमुळे रद्द होऊ शकतं तुमचं रेशन कार्ड; कारवाईचीही शक्यता

पवारांनी ब्राह्मण समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदान असल्याचं सांगून कौतुक केलं. पवारांचे दोन्ही गुरू ब्राह्मण असल्याचं त्यांनी सांगितलं. काही भाषणामुळे ब्राह्मण समाजामध्ये राग निर्माण झाला होता. समाज माध्यमांमध्ये चुकीचा विखारी प्रचार झाला. ही अस्वस्था दूर करणं हे नेत्याच काम म्हणून ही बैठक बोलावली. तणाव दूर करण्यासाठी, संवाद होण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

शरद पवारांची प्रतिक्रिया –

कोणत्याही जातीच्या धोरणाविरोधात बोलू नये असं पक्षात सांगितलय. दुसरी मागणी अशी होती की, ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतो. त्यामुळे नोकरीसाठी संधी मिळण्याची हमी हवी. राज्य आणि केंद्राची आकडेवारी मागवली होती. पण त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व असल्याने आरक्षणाच सूत्र बसत नाही हे मी सांगितलं.

FASTag रिचार्ज करताय? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा तुमचं अकाऊंट होईल रिकामं

यानंतर, कुणालाच आरक्षण देऊ नका अशी मागणी ब्राम्हण संघाकडून करण्यात आली. त्यावर त्यांना मी सांगितलं की, दलितांना गरिबांना आरक्षण द्यावं लागेल. ते मागास आहेत. जोपर्यंत ते प्रगती करत नाहीत तोपर्यंत ही चर्चा करता येणार नाही. हे मत मांडल्यावर त्यांनी माझं काही चूक आहे असं सांगितल नाही किंवा त्यांचं धोरण बदललं असं ही सांगितलं नाही.

Comments are closed.