Take a fresh look at your lifestyle.

BREAKING | महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेलसह गॅसदरात मोठी कपात

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Petrol diesel price इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र आता केंद्र सरकारने (Central Government)इंधन दरवाढीने त्रस्त जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेल स्वस्त झालं आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

FASTag रिचार्ज करताय? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा तुमचं अकाऊंट होईल रिकामं

डीझेल 7 तर पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालं आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल -डीझेलचे दर स्वस्त झाले आहेत. तसेच उज्जवला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलेंडरचे दरही 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल.

गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्क्यांच्या 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही वाढ खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.

तरुणांनो लक्ष द्या! मुंबई पोलीस भरतीसाठी तब्बल इतक्या जागा रिक्त; असा करा अर्ज

पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.