Take a fresh look at your lifestyle.

सेनेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार; शिवसेना खासदारही बंड करणार ?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सध्या दिल्ली दौरा नियोजित आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. कारण, विधानसभेत जवळपास ५० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंद केले. परिणामी,उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता, सेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाली आहे.

शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल (शुक्रवार) झालेल्या विशेष भोजनामध्ये शिवसेनेचे 10 खासदार उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीवेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे 10 खासदार उपस्थित होते. भाजपाचा एक ज्येष्ठ नेताही यावेळी उपस्थित होता, अशी सूत्रांची माहिती आहे.

उपस्थित असलेले खासदार ?

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी 8 खासदार या भोजनाला उपस्थित होते. दरम्यान, आता आंदरांनंतर शिवसेनेचे एकूण 15 खासदार फुटून शिंदे गटामध्ये सहभागी होऊ शकतात अशी माहिती समोर आहे. या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या शिवसेनेच्या बंडाचे पडसाद दिल्लीतही उमटणार हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी शिवसेने मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.