Take a fresh look at your lifestyle.

Breaking news अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Breaking news एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी (Leader of the Opposition in the Assembly) कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

अखेर आज अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व आमदारांनी अजित पवार यांना विरोधीक्षनेते पसंती दर्शवली होती. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी अजित पवारांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी आमदारांनी केली. या पदाला अजितदादा योग्य न्याय देऊ शकतात, असं मत आमदारांनी व्यक्त केलं होतं.

गेले अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस या पदावर होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. मात्र, आता सरकार बदललं असल्याने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर अजित पवार आणि फडणवीसांची जागा घेणार असल्याची चर्चा होती. विरोधी पक्षनेता हे पद अतिशय ताकदीचं असतं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, याचा निर्णय घेतला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.