Take a fresh look at your lifestyle.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आदेशानं शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून (Shiv Sena Central Office) प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली होती. शिवसेनेत बंडखोरी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांनी बंडखोर आमदारांना समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून कारवाईचं सत्र सुरू असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ३९ आमदारांची मोट बांधली आणि बंडाचा झेंडा हाती घेतला. परिणामी, उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला.

या बंडखोर शिवसेना आमदारांच्या आणि भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले जात आहे. तसंच सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

मात्र, पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यानंतर 2 तासांनी त्यांच्यावरील कारवाई रद्द करून त्यांना पुन्हा सेनेत घेण्यात आले. दरम्यान, आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.