Take a fresh look at your lifestyle.

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्हींमध्ये घसरण झाली. मागील 20 दिवसांत सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 155 रुपयांनी कमी होऊन 51,721 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

सोन्याचा भाव 20 दिवसांत 4,087 रुपयांनी कमी

अवघ्या 20 दिवसांत सोन्याचा भाव 4,087 रुपयांनी खाली आला आहे. मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. एमसीएक्सवर चांदीही फिकी पडल्याचे दिसून आले. एक्सचेंजवर चांदीची किंमत 316 रुपयांनी घसरून 68,520 रुपये प्रति किलो झाली. चांदीचा भाव 68,511 वर उघडला होता.

जागतिक बाजारात तेजी

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून ते जागतिक बाजारपेठेत विकण्याची तयारी सुरू आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्याचा हा साठा बाजारात आल्यास त्याचा बाजारातील पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते. भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असली तरी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे.

आज मुंबईतील सोन्याचे दर – 52,310 रुपये प्रति 10 ग्रॅम व चांदीचे दर – 68400 रुपये प्रति 1 किलो असे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.