Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : पुढचे दोन तास महत्वाचे! मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अन् मंत्रिमंडळाची शेवटची बैठक?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – BREAKING शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मुंबईत येणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे.

भाजपला थेट सत्ता स्थापनेचा दावा करता येणार का? सत्ता स्थापनेसाठी करावी लागेल ही प्रक्रिया

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता टेकले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात खळबळ

तर दुसरीकडे शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.