Take a fresh look at your lifestyle.

ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रातील या गावात निघते जिवंत माणसाची प्रेतयात्रा!

0
maher

श्रीधर ढगे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : “आपुले मरण पाहिले मी डोळा, तो सोहळा अनुपम्य” अशा ओळी आपण अभंगातून ऐकल्या आहेत. मात्र त्याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र हे विविध प्रथा परंपरा यांना मानणारे राज्य आहे. सण उत्सवाच्या काळात वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारंपारिक पद्धतीने सण साजरे केले जातात. अशीच एक प्रथा बुलढाणा जिल्ह्यातील बेलाड आणि वरवट बकाल या दोन गावात प्रचलित असून येथे चक्क जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढून धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सर्वत्र रंगाची उधळण करीत धूलिवंदन सण साजरा होत असतानांच या दोन गावात रंगा सोबतच जिवंत माणसाची वाजत गाजत गावातून प्रतिकात्मक प्रेतयात्रा दरवर्षी काढल्या जाते. दरम्यान नाटकी दुःखात लपलेला आनंद मात्र उघड-उघड व्यक्त केला जातो. हा अजब प्रकार प्रथा- परंपरेच्या नावाखाली मलकापूर तालुक्यातील बेलाड आणि संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल गावात दरवर्षी धुलीवंदनाच्या पाहायला मिळतो. या प्रकारात खोट दुःख व खरा आनंद यांचे मिश्रण असले तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकार चक्रावून टाकणारा आहे.

हेही वाचा – गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात ‘हा’ आरोपी हजर, तर्कवितर्कांना उधाण

अशी काढतात प्रेतयात्रा

द्वेष, मत्सर, तिरस्काराला मुठमाती देत रंगात बेरंग होऊन आयुष्यात नवा रंग भरण्याचा उत्सव म्हणून धुलीवंदन साजरा केला जातो. तर या रंगाच्या उधळण सोबतच बेलाड गावात मात्र अनोख्या प्रकारे धुलिवंदनाचा समारोप केला जातो. प्रारंभी एका जिवंत तरुणाला खाटेवर झोपवले जाते. झोपलेला व्यक्ती मरणाचं सोंग करतो. मग येथे तरुणाई हंबरडा फोडून रडते. ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती अचानक मृत्यू पावतो व तेथील वातावरण शोकाकुल होते.अगदी त्याच पद्धतीने येथे वातावरण निर्मिती केली जाते.

हेही वाचा – होळीच्या सणात रंगाचा बेरंग; धुळवडीत फुगा मारल्यानंतर रिक्षा उलटली, पहा थरारक व्हिडिओ….

गावभर निघते मिरवणूक

अंत्ययात्रेसाठी एक तिरडी बनवली जाते त्यावर एक माणूस झोपवला जातो. चार खांदे करी ही तिरडी उचलून अंतयात्रे प्रमाणे वाद्य वाजवीत गावातून मिरवणूक काढतात. दरम्यान गावातील प्रत्येक चौकात खांदेकरी तिरडी ठेवून या ठिकाणी शोक व्यक्त केला जातो. या यात्रेत सहभागी तरुण रंगाने बेरंग होऊन आनंद व्यक्त करतात. गावाला परिक्रमा झाल्यानंतर पेटवलेल्या होळी समोर ठेवून तिरडी जाळण्यात येते.

हेही वाचा – ‘द काश्मीर फाइल्स’ने मोडला ‘दंगल’चा रेकॉर्ड, आतापर्यंत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

कथा जुनी रहस्य कायम!

होळीच्या सणाला प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्याची प्रथा बुलढाणा जिल्ह्यातील बेलाड आणि वरवट बकाल या गावात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र याबाबत नेमकं काय रहस्य आहे, हे कुणीही सांगू शकत नाही. अशाप्रकारे प्रेतयात्रा काढून काय साध्य केले जाते. हेही कळत नाही. मात्र लोक दरवर्षी ही प्रथा पाळत आहेत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. होळीच्या सणाला आनंद साजरा करण्यासाठी असा प्रकार केला जात असावा असेही बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.