Take a fresh look at your lifestyle.

उद्योजकांनी भाजप सारख्या प्रभावी स्ट्रॅटेजीचा वापर करावा – संदीप थोरात, चेअरमन, सह्याद्री फायनान्स लिमिटेड

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर – भाजपचं खरोखर कौतुक करायला हवं, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतंय. कारण, सध्याच्या घडीला भाजप हा केवळ पक्ष नसून एक खूप अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे. या पक्षाचे राजकीय डावपेच, त्यांच्यावर होणारी टीका, विरोधकांच्या मनात त्यांच्याविषयी असणारा राजकीय द्वेष या विषयी आपण काही नं बोललेलं बरं. कारण, हा एक राजकीय भाग आहे. मात्र, स्ट्रॅटेजी कशी ठरवावी आणि ती प्रभावीपणे कशी राबवावी याबाबत हा पक्ष आज खूप पुढे जाऊन पोहचलाय.

इतका पुढे की सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण कल्पना देखील करू शकत नाही. राजकीय पक्षाच्या बाबतीत एखादी स्ट्रॅटेजी ठरवणं हे खूप अवघड असतं. कारण स्ट्रॅटेजी चुकली तर पुढचे 5 वर्ष त्याचं फळ भोगावं लागतं. त्यामुळे स्ट्रॅटेजी इतकी फरफेक्ट ठरवतात की, त्या स्ट्रॅटेजीला काही परीक्षा देखील द्याव्या लागत असतील, असं वाटतं. स्ट्रॅटेजी ठरवल्यानंतर ती राबवणे हा एक पुढचा भाग असतो. कारण स्ट्रॅटेजी राबवणे आणि ती प्रभावीपणे राबवणे यात खूप फरक आहे. विशेष म्हणजे, फक्त निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर कायमच प्रभावी स्ट्रॅटेजी राबवणे यात भाजपचा हातखंडा आहे. अशीच अग्निपरीक्षा देऊन ठरवलेल्या स्ट्रॅटेजीचा प्रभावीपणे वापर करणे, हेच भाजपच्या यशाचं मुख्य गमक आहे.

महत्वाचं म्हणजे काल दिनांक ३० मार्च, २०२२ रोजी भाजप पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची व्हिजन 2024साठी नगर जिल्ह्याच्या प्रभारी पदी नियुक्ती झाली. म्हणजेच, 2 वर्ष निवडणुकीला वेळ असतांना भाजपची यंत्रणा आजच कार्यान्वित झाली आहे. थोडक्यात, आजपासूनच भाजपची नगर जिल्ह्याची स्ट्रॅटेजी ठरणार आणि तिचा 2 वर्षाने प्रभावी वापर होणार. २०२४ च्या निवडणुकीसाठी हा पक्ष तब्बल 2 वर्ष अगोदरपासूनच कामाला लागला आहे.

यातूनच व्यावसायिक तसेच उद्योजकांना खूप काही शिकण्यासारखे आहे. एखादी मोठी मोहीम राबवण्यासाठी अगोदरच तयारीला लागणे महत्वाचं आहे. त्यानंतर, योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करावी लागते,तेव्हा यश मिळतं. ज्याप्रकारे भाजप कायम इलेक्शन मोड वर असते, त्याचप्रमाणे उद्योजकाने देखील कायम योजना आणि प्रभावी अंमलबजावणी याच मोड वर असावे. वेळेला जागे होऊन उद्योग घडत नाही. परिणामी, अपयश हातात आल्याशिवाय राहत नाही. भले तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असाल तरी भाजपची ही बाब प्रत्येक उद्योजकाने आत्मसात करायला हवी अशी प्रतिक्रिया सह्याद्री फायनान्स मल्टिसिटी लिमिटेडचे चेअरमन संदीप थोरात यांनी उद्योजकांसाठी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.