Take a fresh look at your lifestyle.

Maruti Dzire CNG केवळ १ लाख रुपये देवून घरी आणा मारुती डिझायर सीएनजी; ‘इतका’ असेल EMI

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Maruti Dzire VXI CNG Loan EMI Downpament: भारतात सध्या सीएनजी कार्सना मोठी डिमांड आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक सीएनजी गाड्या खरेदी करू लागले आहेत. भारतीय वाहन बाजारातील सीएनजी सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी या भारतीय वाहन उत्पादक कंपनीचा दबदबा आहे. या सेगमेंटमध्ये मारुतीच्या अनेक गाड्या आहेत, ज्यांना मोठी मागणी आहे.

केवळ ५ हजार रुपयांमध्ये Post Office ची फ्रँचायजी सुरु करुन कमाईची संधी!

त्यापैकी एक म्हणजे मारुती सुझुकी डिझायर सीएनजी (Maruti Suzuki Dzire CNG). शानदार लूक आणि उत्कृष्ट फीचर्ससह जबरदस्त मायलेज असलेली मारुती डिझायर ही सेडान कार प्रेमींची आवडती गाडी आहे. कंपनीने डिझायरचे दोन सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केले आहेत आणि या दोन्ही मॉडेल्सची भारतात चांगली विक्री होते. तुम्हीदेखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर ही कार एक उत्तम पर्याय ठरू शकते.

Kia EV9 किआची ही गाडी पाहिलीत का? अर्ध्या तासात होणार 80 टक्के चार्ज

ही कार तुम्ही एक रकमी पैसे न देता विशिष्ट डाऊनपेमेंट करून ईएमआयवर खरेदी करू शकता. या कारसाठी तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपयांचं डाऊन पेमेंट करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला किती कर्ज मिळेल, किती ईएमआय असेल आणि तुमच्याकडून किती व्याजदर आकारला जाईल याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही येथे Desire VXI CNG कारबद्दल माहिती देत आहोत.

Samsung सॅमसंगचा जबरदस्त 5G स्मार्टफोन येतोय, कमी किमतीत मिळतील भारी फीचर्स

कसी आहे डीझायर सीएनजी कार

ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की, ही कार कशी आहे. कारची किंमत, त्यात देण्यात आलेलं इंजिन याबाबतची माहिती तुम्हाला असायला हवी. ही सेडान भारतात LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा एकूण ९ व्हेरिएंट्सच्या ४ ट्रिम लेव्हलमध्ये विकली जाते. या कारच्या सर्वात बेस व्हेरिएंटची किंमत ६.२४ लाख रुपये ते ९.१८ लाख रुपयांच्या (एक्स. शोरूम) दरम्यान आहे. या कारमध्ये ११९७ सीसी क्षमतेचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

FASTag रिचार्ज करताना या चुका करू नका; अन्यथा अकाउंट होईल रिकामं

जे सीएनजी किटला देखील जोडलेलं आहे. ही कार मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये देखील उपलब्ध आहे. ही कार पेट्रोलवर २३.२६ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर सीएनजीवर ३१.१२ किमी प्रति किलोपर्यंतचं मायलेज देते. मारुती डिझायर लूक आणि फीचर्सच्या बाबतीतही उत्तम कार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.