Take a fresh look at your lifestyle.

मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी ‘कॅग’ करणार; रस्ते विकास व पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शिंदे -फडणवीस (Shinde -Fadanvis) सरकार स्थापनेनंतर महाविकास आघाडी सरकार विशेषतः उद्धव ठाकरे यांना दणके देण्याचे सत्र सुरु असून एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन राज्य सरकार विरोधकांना प्रत्यक्ष कृतीने उत्तर देत आहे. सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून विरोधक केवळ घोषणाबाजी व टीका टिप्पणी करण्यात मश्गुल असताना उपमुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. येत्या काळात महापालिका निवडणूक दृष्टीसमोर ठेवून मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची महालेखापरीक्षक (CAG) यांच्याद्वारे ऑडिट करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तसेच पालिकेतील इतर काही भ्रष्टाचार आरोपांची चौकशी नगर विकास खात्यातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल असे उपमुख्यमंत्र्यांनी विधानभवनात सांगितले.

BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! ‘इतक्या’ रुपयांमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल अन् बरंच काही…

मुंबईतील रस्ते विषय गेले काही दिवस चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. हा मुद्दा निकाली काढत सुमारे १२०० किलोमीटर अंतराचे रोड येत्या ३ वर्षात संपूर्णतः काँक्रेटीकरण करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय बीडीडी चाळीत पोलिसांना नाममात्र दरात स्वतःची घरे उपलब्ध करून देण्यात येतील, याबाबतीत आवश्यकता भासल्यास सरकार अनुदान देऊन पोलीस बांधवांना स्वतःची हक्काची घरे मिळवून देण्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयांचा येत्या काळातील महापालिका (Mahanagarpalika) निवडणुकीवर सकारात्मक परिणाम बघायला मिळू शकतो. याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसून पक्ष अस्तित्वाची लढाई आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यात राज्यपाल आणि आमदार-खासदारांची जुगलबंदी; एकमेकांवर टीका-टिप्पणी

कॅग सारख्या यंत्रणेद्वारे ऑडिट केल्याने महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार यात दुमत नाही परंतु यात महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत होणार व येत्या काळात या तिघाडी युतीचे भविष्य पणाला लागणार, हे नक्की!

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.