Take a fresh look at your lifestyle.

Car Loan घेणाऱ्यांना मोठा दिलासा, ‘या’ बँकेकडून व्याजदरात मोठी कपात, चेक करा नवीन व्याजदर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) कार कर्जावरील व्याजदरात (Car Loan Interest rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने कार कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 7 टक्के केला आहे. आतापर्यंत बँक 7.25 टक्के वार्षिक व्याजाने कार लोन देत होती.

बँकेकडून ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी कार खरेदी करणाऱ्या नवीन ग्राहकांना दिली जात आहे. तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बँकेच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकता. कार कर्जाचा हा विशेष दर 30 जून 2022 पर्यंतच आहे. मात्र जुन्या म्हणजेच सेकंड हँड कार आणि दुचाकी कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

सोमवारी एका निवेदनात, बँकेने सांगितले की व्याज दर कपातीव्यतिरिक्त, 30 जूनपर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्क 1,500 रुपये (GST सह) कमी केले आहे. विशेष बाब म्हणजे व्याजदर ग्राहकाच्या ‘क्रेडिट प्रोफाइल’शी जोडला जाईल.

पीटीआयशी बोलताना, बँकेचे महाव्यवस्थापक (मॉर्गेज एंड ऑदर रिटेल एसेट्स) एचटी सोलंकी म्हणाले की, कार कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कात कपात केल्यामुळे, आता ग्राहकांना त्यांच्या आवडीचे वाहन खरेदी करणे अधिक परवडणारे असेल.

बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले होते

गेल्या महिन्यात बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदरात (Home Loan Interest rate) कपात करण्याची घोषणा केली होती. बँक आता 6.75 टक्क्यांऐवजी 6.5 टक्के वार्षिक व्याजाने गृहकर्ज देत आहे. 22 एप्रिलपासून नवे दर लागू झाले आहेत. गृहकर्जाचा हा विशेष दर 30 जून 2022 पर्यंतच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.