Take a fresh look at your lifestyle.

छगन भुजबळांवर मुंबईत गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सध्या चांगलेच चर्चेत असून विविध प्रकरणी ते प्रकाशझोतात येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा फोटो का लावायचा? असे वादग्रस्त विधान केले होते. सदर प्रकरण अजूनही शमत नाही ते एका नव्या प्रकरणात ते अडकले आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी छगन भुजबळांविरुद्ध चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल २१ दिवस सुट्ट्या; सणासुदीच्या काळात शेअर बाजार ३ दिवस बंद राहणार

सविस्तर वृत्त असे की, ललितकुमार टेकचंदानी नामक व्यक्ती मुंबई येथील चेंबूरचे रहिवासी असून त्यांनी छगन भुजबळ यांचे हिंदू धर्माविरुद्ध भाष्य करणारे व्हिडीओ शेअर केले होते. सदर व्हिडीओ मध्ये छगन भुजबळ हिंदू धर्माविषयी बोलताना दिसत आहे. त्यामुळे ललितकुमार टेकचंदानी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार त्यांनी चेंबूर पोलिसांत दिली, यामुळे पोलिसांनी अन्य दोन व्यक्तींसह छगन भुजबळांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार; विकासकार्यांना गती देणार

छगन भुजबळांनी सरस्वती देवीच्या फोटोवर केलेल्या विधानाचे पडसाद आता सामाजिक वर्तुळात उमटत असल्याचे दिसून येत आहे. परंतु जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार हा राज्यातील वातावरण तापवू शकतो. येत्या काळात या प्रकरणी राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते, हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.