मित्रांनो, सरकारकडून नागरिकांच्या बँकेच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यात येत आहे. यामध्ये लोकांकडून बँकेत किती bank cash ठेवण्यात येते व बँकेतून cash withdrow करण्याच्या व्यवहारांवर watch ठेवण्यासाठी इन्कम टॅक्स कडून काही नियम घालून देण्यात आले आहे.
एका आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही तुमच्या एका बँक खात्यात किंवा एकापेक्षा अधिक बँक खात्यात मर्यादेपेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर आता तुम्हाला पॅन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
जर कमी 20 लाखापेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर त्याची माहिती बँकेकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठविली जाते. तसेच एवढी मोठी रक्कम आपल्याकडे कुठून आली याची कारणे देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशा प्रकारच्या मोठ्या व्यवहारांवर ती नजर ठेवून असते.
केंद्रीय प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत चालू खात्यावर वीस लाख पेक्षा जास्त रोख रक्कम बँकेत जमा करताना आता आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक करण्यात आले आहेत.