Take a fresh look at your lifestyle.

cement price सिमेंट झालं स्वस्त; आता कमी पैशात घर बांधा मस्त!

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – cement price स्वतःच घर असावं असा प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यात प्रत्येकाच्या ड्रीम होमचं बजेट वेगळं असतं. तुम्ही देखील घर बांधण्याचा (Build a Home) विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बांधकामासाठी लागणारं साहित्य सध्या स्वस्त मिळत आहे. कमी मागणी, रिअल इस्टेट क्षेत्राची (Real Estate Sector) दुर्दशा आणि सरकारचा हस्तक्षेप यामुळे बांधकाम साहित्याच्या किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने खाली आल्या आहेत. Steel Price

Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन

सध्या लोखंडी रॉडची किंमत (Iron Rod Price) विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. या कारणांमुळे, स्वप्नातील घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ बनली आहे. हे सर्व घटक मिळून घराच्या बांधकामासाठी हीच खरी वेळ आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे. Steel Price

🏏वनडे क्रिकेटमध्ये घडला इतिहास! इंग्लंडची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी; तब्बल 498 रन, 26 सिक्स 36 फोर

दिल्लीत विटांच्या किमती घसरल्या

विटांच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दिल्लीत त्याची किंमत हजार युनिटमागे 1-2 हजार रुपयांनी कमी झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विटांचा व्यवसाय करणाऱ्या डीबीएफ ब्रिक्स या कंपनीनुसार, दिल्लीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या 1000 विटा 5000 रुपयांना मिळत आहेत. तसेच क्रमांक दोनच्या हजार विटांची किंमत 4 हजार रुपये आणि मऊ जातीच्या हजार विटांची किंमत 4 हजार 700 रुपये झाली आहे. दुसरीकडे यूपी ब्रिक्स 5,300 रुपये प्रति हजार युनिट आणि हरियाणा विटा 5,500 रुपये प्रति हजार युनिट दराने उपलब्ध आहेत. महिनाभरापूर्वी त्यांच्या किमती किमान 6000 रुपयांच्या वर होत्या.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सिमेंटचे दरही घसरले.

एप्रिलमध्ये सिमेंटचा भाव 340 रुपये प्रति बॅगवर पोहोचला होता. सिमेंटच्या दरात घसरण सुरूच आहे. हल्ली सिमेंटचा भाव २८० रुपये प्रति बॅगपर्यंत पोहोचला आहे. कोणत्याही प्रकारच्या तेजीला बाजारपेठ साथ देत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीत मोठी घट झाली आहे, त्यामुळे दरात घट झाली आहे. तसेच, भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.

वनडे क्रिकेटमध्ये घडला इतिहास! इंग्लंडची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी; तब्बल 498 रन, 26 सिक्स 36 फोर

Comments are closed.