Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ लवकरच ‘हा’ नवा बदल लागू करण्याची शक्यता; करदात्यांकडून सूचना मागविल्या

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात ‘एक राष्ट्र एक कर प्रणाली’ ला चालना देण्यासाठी जीएसटी पद्धत लागू करण्यात आली होती, त्याअंतर्गत वस्तू आणि सेवांवर देशभरात कर आकारणी केली जाते. आता आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स बाबत देखील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ काही महत्वपूर्ण बदल करण्याचा विचार करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ‘एक राष्ट्र एक आयटीआर फॉर्म’ लागू करण्यावर सध्या विचार करत असल्याचे समजते. या नव्या बदलांबाबत करदाते काय विचार करता याबाबतीत देखील मत जाणून घेण्याचा मंडळाचा मानस आहे त्याकरिता हा नवा फॉर्म सर्व करदात्यांना पाठविण्यात येत असून त्यांच्या सूचना मागविण्यात येत आहे.

ई-वाहन वापरास राज्यात अधिक पसंती; खरेदीत यंदा विक्रमी वाढ

सध्या भारतात आयकर भरण्यासाठी सात विविध प्रकारचे फॉर्म उपलब्ध असून त्यांचे विभाजन उत्पन्नाचे स्रोत तसेच त्यांचे प्रकार इत्यादीनुसार करण्यात आले आहे. नव्याने लागू करण्यात येणाऱ्या पद्धतीनुसार सर्व प्रकारचे करदाते केवळ एकच फॉर्म भरून देत आयकराची फेड करू शकणार आहे. या प्रक्रियेतून नफा न कमविणाऱ्या संस्था तसेच ट्रस्ट इत्यादींना वगळण्यात येणार आहे.

भारतातील ‘हा’ दिग्गज उद्योग समूह ४५,००० महिलांना नोकरी देणार

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या विचाराधीन असलेला प्रस्तावित फॉर्म हा आयटीआर ७ वगळता इतर सर्व फॉर्म ला एकत्रित करत तयार करण्यात येणार आहे. इथे विशेष बाब म्हणजे नवा आयटीआर फॉर्म हा आयटीआर १ व आयटीआर ४ फॉर्म सह उपलब्ध असणार आहे, परंतू आयटीआर २, आयटीआर ३, आयटीआर ५ आणि आयटीआर ६ भरणाऱ्यांना जुन्या फॉर्मचा पर्याय उपलब्ध राहणार नाही. एकंदरीतच आयकर रिटर्न भरताना वेळ तसेच श्रम वाचावे आणि रिटर्न भरणे सोपे करण्याचा कर मंडळाचा विचार असल्याचे समजते, परंतू ही नवीन पद्धत किती सोपी किंवा कठीण आहे हे प्रत्यक्ष लागू झाल्यावरच कळेल, तूर्तास वाट बघणे योग्य ठरेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.