Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा तब्बल ३३९ पक्षांना दणका; विविध राज्यातील पक्षांवर कारवाई

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यपातळीवर पक्षाला दर्जा मिळवून द्यायचा झाल्यास विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत विशिष्ट प्रमाणात त्या पक्षाला मते मिळवणे आवश्यक असते याशिवाय पक्ष नोंदणी केल्यानंतर त्या पक्षाने निवडणूक लढविणे आवश्यक असते अन्यथा काही पक्ष नोंदणी केल्यानंतर निष्क्रिय राहतात. अशा सर्व पक्षांना बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष म्हटल्या जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यातील तब्बल ३३९ अशाच पक्षांवर निष्क्रिय पक्ष म्हणून याशिवाय यादीतून वगळण्याची कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये २५३ पक्षांना निष्क्रिय पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे याशिवाय ८६ पक्षांची बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांच्या यादीतून गच्छंती केली आहे.

मोठी बातमी : शिर्डी साई संस्थानचे ‘विश्वस्त मंडळ’ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

कारवाई करण्यात आलेले पक्ष हे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली व तेलंगणा इत्यादी राज्यातील आहे, यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ११ पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील निष्क्रिय पक्ष म्हणून शिवाजी काँग्रेस पार्टी, भारतीय रिपब्लिकन पक्ष कांबळे गट, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, द ह्युमॅनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अमन सेना इत्यादींचा समावेश आहे. तर यादीतून वगळलेल्या पक्षांमध्ये क्रांतिसेना महाराष्ट्र, रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी, सत्यवादी पक्ष, किसान गरीब नागरिक पार्टी, उत्तराखंड सेना पार्टी व राष्ट्रीय सर्वसमाज पार्टी यांचा समावेश आहे.

गुंतवा ‘या’ मुदत ठेवीत पैसा, दोन वर्षांत लक्षणीय परतावा

या सर्व पक्षांना विविध निवडणुकांमध्ये एकतर विशिष्ट प्रमाणात मते प्राप्त करण्यात अपयश आले आहे किंवा पक्ष नोंदणी नंतर अनेक दिवसांपासून ते निष्क्रिय असल्याने सदरची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.