Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; पगारात होणार मोठी वाढ तर,…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : यंदा सणासुदीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकामागून एक नवीन गिफ्ट मिळत आहे. पुन्हा एकदा त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी एक मोठी वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकाचवेळी चार भत्त्यांमध्ये वाढीचा लाभ मिळू शकणार आहे.

मोठी बातमी : बंगळूर शहरात ओला, उबेर ऑटोसेवेला बंदी; अधिक प्रवास शुल्क आकारणीच्या तक्रारी प्राप्त

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार पुन्हा नवीन गिफ्ट म्हणजे घरभाडे भत्ता (HRA). नियमाप्रमाणे, महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते. सातव्या वेतन आयोगानुसार ३८ टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅच्युइटीही आपोआप वाढतील.

दीक्षाभूमीवरील अनुयायांनी घेतला मनपाच्या निवाऱ्यात आसरा

केंद्रीय कर्मचार्‍यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत DA वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याचीदेखील खात्री आहे. इतकेच नाही तर, DA वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, असे बोलले जात आहे. दरम्यान, महागाई भत्ता 34 टक्क्यांहून 38 टक्के केला आहे. त्यामुळे HRA मध्ये वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.