Take a fresh look at your lifestyle.

‘PFI’ वर केंद्र सरकारची बंदीची कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना चर्चेत असून पुण्यात या संघटनेने निदर्शने करत पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले होते त्यामुळे सुरक्षा यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक या संघटनेवर लक्ष ठेवून होते. या संघटनेचे जाळे देशातील अनेक राज्यात असून देशाची राजधानी दिल्लीत देखील संघटना सक्रिय आहे. एनआयए च्या छापेमारीतून संशयास्पद साहित्य मिळाल्याने तसेच संघटनेच्या अटक केलेल्या लोकांकडून खळबळजनक तथ्य समोर आल्याने केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणेच्या सूचनेनुसार पाच वर्षांकरिता बंदीची कारवाई केली आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे संघटनेचे धाबे दणाणले आहे, तरीसूध्दा सुरक्षा यंत्रणांना सदर संघटनेच्या गुप्त हालचालीवर लक्ष पुरवावे लागेल.

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार : यंदा तब्बल ९ पुरस्कार प्राप्त करत राज्याने मारली बाजी

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले असून, झालेली कारवाई योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत देशभरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ३५३ जणांना अटक करण्यात आली असून, चौकशीची प्रक्रिया अदयाप सुरु आहे. राज्यातील सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता दहशतवाद विरोधी पथकाने याबाबतीत पुरावे सादर केले असून, भविष्यात या संघटनेच्या कुठल्याही प्रत्यक्ष कृतीवर बंदीमुळे अंकुश लावण्यात मदत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यालयाने सदर बंदीची कारवाई केली असून याबाबतीत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.