Take a fresh look at your lifestyle.

अध्यक्षपदी भुजाडी तर तनपुरे उपाध्यक्ष

0

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : राहुरीच्या सहकाराच्या राजकारणातील अग्रगण्य असलेल्या राहुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप भास्करराव भुजाडी यांची तर उपाध्यक्षपदी माजी नगरसेविका व विद्यमान संचालिका ज्योती विलास तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन सहकारी बँकेचे संचालक ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनातून सत्ताधारी गटाचे 10 तर सर्व
विरोधी कर्डीले विखे गटाच्या परिवर्तन मंडळाचे 3 संचालक बिनविरोध निवड झाली.

आज संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी राहुरीचे सहाय्यक निबंधक डी एस नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी प्रदीप भुजाडी यांच्या नावाची सूचना संचालक चंद्रकांत गणपत उंडे यांनी मांडली. त्यास संचालक भाऊसाहेब यशवंत वराळे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी ज्योती विलास तनपुरे यांच्या नावाची सूचना संचालक दिनकर प्रभाकर पवार यांनी मांडली. अनुमोदन गोरक्षनाथ भागवत उंडे यांनी दिले. दोन्ही पदासाठी एकच नाव आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दीपक नागरगोजे यांनी दोन्ही नावे बिनविरोध निवड म्हणून घोषित केले.

यावेळी जेष्ठ संचालक बाबासाहेब तनपुरे, सुभाष तनपुरे, विठ्ठल तमनर, वैशाली कोरडे आदी संचालक उपस्थित होते. विरोधी आघाडीचे दिपक मेहेत्रे वगळता इतर दोघे संचालक निवड बैठकीसाठी अनुपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.