Take a fresh look at your lifestyle.

विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट; तर महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढत्या उष्णतेमुळे सर्वच पावसाची आतुरनेते वाटत पाहतायेत. याच पावसाबाबत (Rain Update 2022) मोठी बातमी समोर आली आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मोसमी पाऊस पुढील 24 तासांमध्ये अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

असनी चक्रीवादळाने बदलला मार्ग, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस?

तसेच केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील 9 जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ड्राइविंग लायसन्स बनवण्याचे बदलले नियम… आता करावे लागणार ‘हे’ काम

मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू आहे. आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

राजधानी दिल्लीत आजचे तापमान ४९ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. (Delhi today temperature) दुसरीकडे, नजफगडमध्ये ४८.८ अंश सेल्सिअस तर रोहतकमध्ये ४८ अंश सेल्सिअस तापमान होते. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि.16) सोमवारी देशाची राजधाना दिल्ली येथे धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे उष्माघातासोबत दिल्लीकरांना आता धुळ खावी लागण्याची शक्यता आहे.

तुमच्या जिल्ह्याची प्रत्येक बातमी व्हॉट्सऍपला मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम

उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. तिथे कमाल तापमानाचा पारा हा 45 ते 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचलाय. त्यामुळे तिथल्या स्थानिकांची लाहीलाही झाली आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना इशारा

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 4 दिवसांचा यलो अलर्ट दिला आहे.

IPL 2022 : वॉर्नरनं आऊट झाल्यानंतर दिली अंपायरला खुन्नस, पाहा 8 सेकंदांचा थरार! पाहा VIDEO

Comments are closed.