Take a fresh look at your lifestyle.

FD आणि Home loan च्या व्याजदरात मोठा बदल! जाणून घ्या कोणती बँक देणार किती फायदा?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Bank Loan सध्या सोपा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून नागरिकांचा कल फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit)कडे असल्याचं पाहायला मिळतं. आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी आपापल्या फिक्स्ड डिपॉझिट (FD interest Rates) आणि गृहकर्जावरच्या व्याजदरांत (Home loan interest rates) बदल केले आहेत. त्यामुळे आता एफडीवर मिळणारं व्याज, किंवा गृहकर्जावर भरावं लागणारे व्याज यामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे तुम्ही एफडी (New FD Rates) उघडण्याचा किंवा गृहकर्ज (New Home loan interest rates) घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. ‘बँकबझार’ BankBazaar या वेबसाइटने सर्व बँकांचे एफडी आणि गृहकर्जावरच्या व्याजाचे दर प्रसिद्ध केले आहेत.

महागाईचा भडका; सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार

कोणत्या बँकेची एफडी फायद्याची?

सर्वप्रथम आपण कोणत्या बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (All Banks FD rates) किती व्याज मिळतंय ते पाहू या. एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या आणि एक ते दोन वर्षं कालावधी असणाऱ्या एफडीसाठी बऱ्याच बँका 6.50 टक्के व्याजदर (Interest Rates) देत आहेत. यांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, इंडस इंडिया बँक, जन स्मॉल फायनान्स बँक, आरबीएल बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक अशा बँकांचा समावेश होतो.

मान्सूनपूर्व पावसाचं राज्यात थैमान; ‘या’ भागातील मंदिर परिसरात गुडघाभर पाणी, रस्ते पाण्याखाली

याच कालावधीमधल्या एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या ठेवीसाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) सर्वाधिक 6.60 टक्के व्याज देते, तर स्कॉटिया बँक (Scotia Bank) सर्वांत कमी 2.40 टक्के व्याज देते. अन्य बँकांचे व्याजदर 3 ते 6 टक्क्यांदरम्यान आहेत. एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या 2 ते 3 वर्षांच्या एफडीसाठी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) सर्वाधिक 7.00 टक्के व्याज देते. हाच कालावधी आणि रकमेसाठी स्कॉटिया बँक सर्वांत कमी 2.55 टक्के व्याज देते.

💥मोठी बातमी! ज्ञानवापी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिले हे ३ पर्याय

बँकांचा व्याजदर
एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या 1 ते 2 वर्षं कालावधीच्या ठेवीसाठी अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) 5.60 टक्के, बँक ऑफ इंडिया (BOI) 5.20 टक्के, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) 5.00 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 5.20 टक्के तर एचडीएफसी (HDFC) 5.10 टक्के व्याजदर देते. एवढ्याच मर्यादेतल्या रकमेसाठी 2 ते 3 वर्षांच्या ठेवीवर आयसीआयसीआय बँक 5.20 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 5.45 टक्के आणि एचडीएफसी बँक 5.20 टक्के व्याज देते. अ‍ॅक्सिस आणि बँक ऑफ इंडिया या बँकांचे व्याजदर दोन्ही कालावधीसाठी सारखेच आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.