Take a fresh look at your lifestyle.

पिंपळगाव उंडा सेवा सोसायटीत चन्नाप्पा महाराज शेतकरी पॅनेलचा विजय

0

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड : तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेची असलेली पिंपळगाव उंडा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी चन्नाप्पा महाराज शेतकरी पॅनेलने सर्व १३ जागा मोठ्या फरकाने जिंकून एकतर्फी विजय मिळविला व ३० वर्षांपासूनची सत्ता कायम राखली. विजयानंतर आपटी, वाघा व पिंपळगाव उंडा येथील नेते, सभासद, कार्यकर्ते व उमेदवारांनी एकच जल्लोष केला.

पिंपळगाव उंडा सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी आपटी, वाघा हे गावे एकत्र होते. रविवारी मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. विजयी उमेदवार- अनिल बारस्कर, अशोक बारस्कर, विलास बारस्कर, भास्कर ढगे, सतिश ढगे, तात्या गोरे, बापूराव जगदाळे, भानुदास पवार, अनुराधा ढगे, कौशल्या ढगे, बुध्दीवंत साळवे, संजय ढगे, अजयकुमार बाराते हे उमेदवार विजयी झाले.

मतमोजणीत सुरवातीपासून चन्नाप्पा महाराज मंडळाचे सर्व उमेदवार पहिल्या पासून ते शेवटपर्यंत आघाडीवर होते. या मंडळाचे नेते आपटी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार गोरे, वाघा गावचे सरपंच श्याम बारस्कर, पिंपळगाव उंडा सोसायटीचे चेअरमन सतिश ढगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास मोरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

विजयी सभेत बोलताना वाघा गावचे सरपंच व पॅनेलचे नेते प्रा. श्याम बारस्कर म्हणाले, पिंपळगाव उंडा सोसायटी आपटी, वाघा व पिंपळगाव उंडा या तीन गावची मिळून आहे. मागील अनेक वर्षापासून संस्था सत्ताधारी मंडळाच्या ताब्यात आहे. या काळात संस्थेकडून कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक व दुजाभाव करण्यात आला नाही. त्यामुळे सभासदांनी पुन्हा कौल दिला यापुढील काळात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येतील असे प्रा. श्याम बारस्कर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.