Take a fresh look at your lifestyle.

पुढील महिन्यात येतेय देशातील सर्वात स्वस्त Electric Car, बुकिंगला झाली सुरुवात

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : Cheapest Electric Car: देशभरात सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोलच्या किंमतींनी देशभरात ११० रुपयांचा टप्पा पार केला आहे. पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमतीमध्ये सतत होणाऱ्या वाढीला नागरिक त्रासले असल्याचं चित्र आहे. परिणामी, ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. मात्र, असं असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या आयसीई वाहनांच्या तुलनेत (पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या) खूप जास्त आहेत. Electric Car

फक्त ३० हजारात सुपर स्पोर्ट्स बाईक घरी घेऊन जा, मिळेल फास्ट स्पीड आणि जबरदस्त स्टाईल

सध्या भारतीय वाहन बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक वाहनांची गरज आहे. हळूहळू स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच होऊ लागल्या आहेत. असं असताना भारतात अद्याप एकही स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच झालेली नाही. १२.४९ लाख रुपये किंमत असलेली टाटा टिगॉर ही सध्या भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. मात्र आता लवकरच भारतात एक स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. तुम्हीही कमी बजेटमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करत नसाल तर ही बातमी तुमचं इलेक्ट्रिक कारचं स्वप्न पूर्ण करू शकते. electric car best

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार; ‘ही’ आहे सरकारची खास योजना

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ईव्ही स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक (PMV Electric) जुलैमध्ये देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ईएएस-ई (EaS-E) लाँच करू शकते. ४ दरवाजे आणि २ सीट असलेली ही कार बाजारात दाखल होईल. कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन यूजर्स ही आगामी कार बुक करू शकतात.

पेट्रोलचं टेन्शन विसरा, Hero च्या 6 Electric Scooter बाजारात; पाहा संपूर्ण Price List

EaS-E चे स्पेक्स आणि बॅटरी रेंज

PMV इलेक्ट्रिकने EAS-e इलेक्ट्रिक कारचं डिझाईन न्यू जनरेशन ग्लोबल मायक्रो इलेक्ट्रिक व्हेईकल सिट्रॉन एएमआय आणि एमजी ई २० प्रमाणे तयार केलं आहे. या कारमध्ये कंपनीने 10 kWh ची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी दिली आहे, जी 3 kW AC चार्जरने चार्ज करता येईल. पीएमव्हीने दावा केला आहे की, EAS-e इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर १६० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. ही कार चार्ज करायला ४ तासांपेक्षा कमी वेळ लागेल. या कारच्या बॅटरी सेलवर कंपनी ५ ते ८ वर्षांपर्यंतची वॉरंटी देईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.