Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या आधार कार्डचा मोबाईल सिमसाठी गैरवापर होतोय का? आधारशी लिंक सर्व फोन नंबर घरबसल्या तपासा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – आधार कार्ड सध्या सर्वात महत्वाचं ओळखपत्र म्हणून वापरलं जातं. बँकेत, नवीन सिम कार्ड घेण्यासाठी, ओळखपत्र म्हणून, बँकेत, आर्थिक कामांसाठी आधार कार्डचा उपयोग होतो. त्यामुळे, (Aadhar Card) आता प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड महत्वाचं आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचा वापर वाढत आहे. याच आधार कार्डचा जितका चांगल्या कामांसाठी वापर केला जातो, तितकाच वापर चुकीच्या कामांसाठी देखील केला जाऊ शकतो. यामुळेच, त्यामुळेच आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या (Aadhar Card Fraud) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.

17 वर्षांची आई, 12 वर्षाचा बाप; बनले नवजात बाळाचे पालक, काय आहे नेमकी घटना

महत्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर इतर ठिकाणी होवू शकतो. प्रामुख्याने तुमचे आधार कार्ड वापरून एखादी व्यक्ती सिम कार्ड देखील जाणीव शकते. आधार कार्डावर सिम कार्ड (Sim Card) देण्याच्या बाबतीत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची आधारशी संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नका हे महत्त्वाचे आहे.

मोबाईल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी, तुम्हाला तुमचे वैध आधार कार्ड दाखवावे लागेल आणि त्यानंतरच तुमच्या नावाने सिम जारी केले जाईल. दरम्यान मोबाईल सिम दुसऱ्याच्या आधारकार्डवर अज्ञात व्यक्तीला देऊन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत.

IMPORTANT! नागरिकांनो लक्ष द्या! राम मंदिर, कलम ३७० नंतर मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

आर्थिक आणि इतर गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार इतरांच्या आधारे जारी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करतात. म्हणूनच तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा कोणी गैरवापर करत आहे की नाही हे तपासत राहणे गरजेचे आहे. आता तुमच्या आधारशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे शोधणे अगदी सोपे आहे.

तुम्ही काही मिनिटांत तुमच्या फोनवर ते तपासू शकता. तुमच्या आधार क्रमांकावर किती सिम सक्रिय आहेत हे शोधण्यासाठी सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. त्याचे नाव टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे आहे. या पोर्टलद्वारे, वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

शेवटच्या षटकाचा व्हिडीओ पहाच! अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची मॅच फिनिशिंग खेळी; चेन्नईचा थरारक विजय

Leave A Reply

Your email address will not be published.