Take a fresh look at your lifestyle.

खरेदी करा सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्प्लेंडर ; सिंगल चार्जमध्ये तब्बल १८० KM पर्यंत रेंज!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – जगभरासह भारतात देखील इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढतांना दिसत आहे. यासाठी दोन प्रामुख्याने दोन गोष्टी जबाबदार आहेत. पहिली म्हणजे भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अजूनही दिवसागणिक इंधनाच्या किंमतीत वाढ होतच आहे. हे दर वेगाने वाढत असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जातोय. मग याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे, भारतीय बाजारपेठेत देखील इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरु झाला आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा वेग मंदावला असला, तरीही विविध कारणांसाठी इलेक्ट्रिक वाहन नागरिक खरेदी करतच आहेत. यात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीला कार खरेदीच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिलं जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा वाढता कल पाहून बऱ्याच दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांनी आता आकर्षक लुक असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक बनवायला सुरुवात केली आहे. आता अलीकडेच, विनय राज सोमशेखर यांनी हिरो स्प्लेंडरचा इलेक्ट्रिक अवतार ओंलीने दाखवला आहे. महत्वाचं म्हणजे मोटोकॉर्प कंपनीनेच ही बाईक डिझाईन केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता मार्केटमध्ये स्प्लेंडरसारख्या दुचाकीला इलेक्ट्रिक स्वरूपात बनवलं गेलं तर बऱ्याच गोष्टी बदलतील.

दरम्यान, विनय राज सोमशेखर यांनी स्प्लेंडरचा हा इलेक्ट्रिक अवतार लिंक्डइनवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी पुढे लिहिलंय की, ‘भारतीयांसाठी हिरो स्प्लेंडर हि गरज बनली आहे. स्प्लेंडरची कामगिरी उत्तम आहे आणि ती कधीच जुनी होत नाही. स्प्लेंडरच्या डिझाईनमध्ये देखील आपण कोणतीही त्रुटी शोधू शकत नाही.

स्प्लेंडरच्या जुन्या बाईकमधून घेतलेले बहुतेक भाग हे एक डिजिटल रेंडर स्वरूपात आहेत. जुन्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्प्लेंडरमधून घेतलेल्या बहुतेक पार्ट्सचा समावेश करण्यात आला आहे आणि इलेक्ट्रिक अवतारसाठी फक्त काही बदल केले आहेत. बाईकच्या इंजिनला काळ्या रंगाच्या बॅटरी पॅकने बदलले आहे आणि त्याच्या इंजिनशिवाय गिअरबॉक्स काढून टाकण्यात आला आहे. ती इलेक्ट्रिक दिसण्यासाठी बाईकच्या सर्व ठिकाणी निळ्या रंगाची पट्टी देण्यात आली आहे ज्यामुळे ती दिसायला खूपच आकर्षक आहे.

इलेक्ट्रिक स्प्लेंडर किती दमदार आहे?

हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या रेंडरमध्ये बाईकसोबत 9kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, जे बाईकच्या मागील चाकाला पॉवर देते. तसेच या बाईकसोबत वेगळी 2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी लहान आकाराची असेल असे गृहीत धरले जाऊ शकते. स्प्लेंडरमध्ये पेट्रोल जिथून भरते, ते चार्जिंग पोर्ट या बाइकमध्ये देण्यात आले आहे. 6 kWh बॅटरीसह, बाईक 180 किमीची रेंज देते जी 4 kWh बॅटरीसह 120 किमीपर्यंत कमी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.