Take a fresh look at your lifestyle.

Credit Card: एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आधी ‘हे’ फायदे आणि तोटे जाणून घ्या

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Credit Card News सध्या अनेकजण एका पेक्षा अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरताना दिसतात, मात्र हे क्रेडिट कार्ड व्यवस्थित मॅनेज करता आले आले नाही तर अगदी 2 क्रेडिट कार्ड्स असणे देखील तुम्हाला खूप महागात पडू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही त्यांचा योग्य वापर करत असाल तसेच वेळीच बिल भरून व्यवस्थित मेंटेन करत असाल तर एकपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

IPL २०२२ जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस; उपविजेती टीमही मालामाल

अधिक क्रेडिट कार्डचे फायदे

युटिलायझेशन रेशो / क्रेडिट स्कोअरमध्ये फायदा (Credit Score)

एकपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड वापरात असतील मात्र पेमेंट वेळेवर करत असाल तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) सुधारतो. तसेच, एकाच क्रेडिट कार्डवरील वापराचे प्रमाणही कमी आहे. जे क्रेडिट स्कोअर वाढवते.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा फायदा असा आहे की जर काही कारणास्तव तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणखी एक सायकल मिळेल.

वाह ! शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना; जाणून घ्या भन्नाट फायदे

हाय लिमिटचा फायदा(High credit Limit)

अधिक कार्ड्स तुम्हाला अधिक लिमिट (Credit Limit) देतात. अशा प्रकारे, ही क्रेडिट कार्डे आर्थिक संकटाच्या परिस्थितीत तुमची मदत करू शकतात.

🤩पुढच्या 72 तासांत Monsoon दाखल होणार, राज्यातील ‘या’ भागांना वादळी पावसाचा Alert

खरेदीच्या वेळी पर्याय

ऑनलाइन खरेदीच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना विविध प्रकारचे फायदे दिले जातात. अशा परिस्थितीत अनेक बँका ऑफर देतात आणि अनेक बँकांचे कार्ड तुम्हाला या ऑफर देत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुमच्याकडे अधिक पर्याय तयार होतात.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचे तोटे

जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा खर्चही वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही आणखी कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तसेच त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही तितकाच वाईट परिणाम होईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.