Take a fresh look at your lifestyle.

७० वर्षांनी भारतात ‘चित्ता’ परतणार; पंतप्रधान मोदींना उद्या मिळणार खास भेट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. ७० वर्षांनंतर नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात येणार असल्याने यंदाचा पंतप्रधानांचा वाढदिवस खास असणार आहे. १७ सप्टेंबर रोजी सुमारे सात दशकांनंतर चित्त्यांची ही टीम भारतीय भूमीवर उतरणार आहे. चित्त्यांना कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणून त्यानंतर हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात येणार आहे आणि पीएम मोदी त्यांच्या वाढदिवशी देशाला सुपूर्द करतील.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणामुळे विरोधक आक्रमक; सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

मध्यप्रदेशात वाढदिवसाचे कार्यक्रम

मध्यप्रदेशात १७ तारखेला आफ्रिकन चित्त्यांच्या स्थलांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाची श्योपूरमध्ये तयारी जोरात सुरू झाली आहे. श्योपूरमध्ये सात हेलिपॅड बांधले जात आहेत, त्यापैकी तीन राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधले जात आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.