Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज्यभर दौरा करणार!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना पक्षातील अंतर्गत बंडखोरी नंतर शिंदे गट वेगळा होऊन राज्यात भाजपच्या सहाय्याने नवे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष बघायला मिळत आहे. आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे पक्ष अस्तित्व टिकवण्यासाठी सध्या सर्व शक्ती पणाला लावण्याचा प्रयत्न करत असताना यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काही भागांमध्ये शक्तिप्रदर्शन केले होते. आता प्रत्यक्ष जमीन स्तरावर आपणच खरी शिवसेना आहे हे दाखविण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार असून गाव, वाडे-वस्त्यांपासून थेट मोठ्या शहरांपर्यंत एकनाथ शिंदे राज्यस्तरावर दौरा करणार आहे.

दडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात राज्यात सक्रिय होणार; हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

आदित्यत ठाकरे यांनी शिवसंवाद अभियान राबवत याअगोदर जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला काहीअंशी यश सुद्धा प्राप्त झाले होते. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करणार म्हणून सूतोवाच केले होते, परंतु आता उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी खुद्द एकनाथ शिंदे राज्याचा दौरा करणार आहे. मुंबईसह अन्य भागांत शिंदे गटाचे वर्चस्व व प्रभाव कायम करण्याचा या दौऱ्याचा उद्देश राहणार असून, सहयोगी पक्ष भाजपचा एकनाथ शिंदे यांना किती लाभ होणार, हे आगामी काळात समजेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.