Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचा निर्धार; विकासकार्यांना गती देणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपसोबत युती करत राज्याच्या सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांचा सपाटाच लावला आहे, याअंतर्गत विविध जिल्ह्यातील समस्यांना सोडवण्यावर भर देण्यात येत आहे. राजधानी मुंबई शहरात वाढत्या महानगरीकरणामुळे अनेक समस्यांचा सुळसुळाट असताना आता मुंबईच्या विकसकामांवर लक्ष देण्याचा निर्धार एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबतीत नुकतीच घोषणा करताना आगामी ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करण्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांनी ठेवले आहे.

आरोग्य सेवा आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी तुकाराम मुंढे रुजू

या अंतर्गत मुंबईत तब्बल ४५० रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त शहर ही मोहीम राबविण्यात येणार असून यासोबतच शहरातील आरोग्य सेवा बळकट करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या मुंबईत गटार सफाईसाठी रोबोचा वापर करण्यात येत असल्याने यामुळे घाणकचरा सफाई कामगारांना दिलासा देण्याचे कार्य होत आहे. भविष्यात होणारी विकासकामे अधिक टिकाऊ व उत्तम दर्जाचे करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांचा आहे.

उद्योगविश्व : नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायिकतेकडे तरुणाईचा अधिक कल; कोरोना काळानंतर अर्थार्जनाचे पर्याय बदलले

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्यावर प्रत्यक्षपणे कार्य केल्या जाणार आहे. ज्या कंत्राटदारांनी थातुरमातुर कार्य केले आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले असून जर लोकांना चांगली सुखसुविधा द्यायची असेल तर असले प्रकार टाळले गेले पाहिजे, त्यामुळे पैसे देण्याचे कार्य जर सरकारचे आहे तर योग्य कार्य करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. असे बोलताना याप्रसंगी अधिकाऱ्यांच्या कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी काढल्या.

कर्ज महागले अन् शेअर बाजारात तेजी

एकंदरीतच येत्या ९० दिवसांचे जे लक्ष मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकासाकरिता ठेवले आहे ते स्तुत्य आहे, परंतु अधिकाऱ्यांनी यावेळी हात न झटकता तळमळीने कार्य करण्याची गरज आहे. कारण सामान्य जनतेच्या नशिबी कर चुकवून देखील हालअपेष्टायेत असतील तर प्रशासनाने कामचुकार अधिकाऱ्यांवर शासन करणे देखील गरजेचे ठरते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.