Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांनी दिली ठाणेकरांना दिवाळी भेट; मुंबईपेक्षा ठाण्याचं महत्त्व वाढणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे जिल्ह्यात विकासकामांना गती मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिवाळीत ठाणेकरांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी १७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकूण 21 प्रकल्पांची कामे करण्यात येणार आहेत. ठाणे ते नवी मुंबई परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा प्रकल्प करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच नवीन बोगदे, उड्डाणपूल, रस्ते बांधले जाणार आहेत.

ठाकरे गटासमोर नवा पेच; ‘या’ पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआरडीएच्या माध्यमातून ठाण्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर भर दिला आहे. ठाण्यासह परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एमएमआरडीएकडून १७ हजार कोटी रुपयांचे तब्बल २१ प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. ठाणे आणि परिसरातील संकट आटोक्यात आणण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. ठाणेकर वाहतूककोंडीत अडकू नयेत, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हे प्रकल्प राबविले जाणार आहेत. यासंदर्भातील पत्र एमएमआरडीएला देण्यात आले आहे.

अंधेरी पोटनिवडणूक : सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; पहिली लढाई जिंकणार?

कसे असणार प्रस्तावित पूल व प्रकल्प?

  • कोपरी ते पोटणी खाडीपूल – 6 पदरी – लांबी 1 किमी – 333 कोटी.
  • गायमुख ते भिवंडीदरम्यान तीन खाडीपूल – 1698 कोटी.
  • ठाणे कोस्टल रोड भाग 2 – गायमुख ते फाउंटन हॉटेल 5.36 किमी लांबीचा रस्ता आणि खारेगाव ते कोपरी 7.34 किमी लांबीचा रस्ता – 2107 कोटी.
  • मुरबे ते सातपाटी (पालघर) खाडीवर नवीन पुलाची बांधणी. लांबी 3 किमी – 365 कोटी रुपये.

दिवाळीत संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार?; आरोग्य विभागाचा इशारा

  • शिळ फाटा ते माणकोली – 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण. उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल, देसाई खाडीवर 70 मीटर लांबीचा पूल, दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी 610 मीटर लांबीचा उड्डाणपूल – 1440 कोटी रुपये खर्च.
  • कल्याण ते माणकोली (बापगांव) गांधारी खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पदरी पुलाचे चौपदरीकरण. गांधारी पुल ते राष्ट्रीय महामार्ग दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करून काँक्रीटीकरण करणे – 400 कोटी रुपये.
  • शिळ फाटा ते माणकोली – 9 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण. उल्हास नदीवर 1.6 किमीचा खाडीपूल, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ. कुळगाव, बदलापूर आणि पडघा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग प्रस्तावित – 1558 कोटी रुपये.
  • दहिसर ते मुरबाड रस्ता – 40 किमीचा रस्ता – 3372 कोटी रुपये, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण – 959 कोटी रुपये, वसई ते पालघर नारींगी खाडीवर दुपदरी पूल – 4.56 किमी लांबी – 645 कोटी रुपये.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.