Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या तयारीत; एकनाथ शिंदे घेतायत ‘या’ दिग्गजांची भेट

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना अडचणीत आली आहे. आमदार-खासदारांना (MLA-MP) आपल्या गटात खेचल्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठा खेळ करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) वरिष्ठ नेत्यांची सद्भावनेने भेट घेत असल्याचे शिंदे सांगत असले तरी यामागे शिवसेनेला घेरण्याची त्यांची रणनीती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकनाथ शिंदे ज्या नेत्यांना भेटत आहेत ते सर्व नेते शिवसेना पक्षाचे निवडून आलेले नेते आहे. तसेच त्यांची नावे निवडणूक आयोगाकडेही (Election Commission) नोंदलेली आहेत.

४ लाख विद्यार्थी होणार ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील; ७५ चौकात रोषणाईचे आयुक्तांनी दिले निर्देश

शिवसेना संघटनेत एकूण नऊ पदे असून, त्यात शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना नेते, शिवसेना उपनेते, सचिव, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार, आमदार अशा नऊ पदांवर 282 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहे, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईचे विभाग प्रमुख. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील सहा विभागप्रमुख शिवसेनेच्या या कार्यकारिणीत आहेत.

मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी; ‘या’ दरम्यान नोंदविता येणार हरकती व सूचना

शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण नेमके कोणाचे चिन्ह आहे? हा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या नऊ पदांवरचे 282 सदस्य नेमकी काय भूमिका घेणार ? यावर शिवसेना एकनाथ शिंदेंची राहणार की उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आमदार-खासदारांना आपल्या बाजूने वळवून शिंदे यांनी आधीच शिवसेना आमदारकीचा ताबा घेतला आहे. आता त्यांची पुढची वाटचाल पक्षावर पकड मिळवण्याकडे जात असल्याचे या भेटींवरून दिसून येत आहे.

पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी स्वनिधी महोत्सव २९ जुलै रोजी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री यांची विशेष उपस्थिती

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार, देशातील प्रत्येक पक्षाला दर पाच वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुकीत पक्षप्रमुख आणि इतर पदांचाही समावेश आहे. यापूर्वी 2018 मध्ये शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेत झालेल्या नियुक्त्यांची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. शिवसेनेने दिलेले हे पत्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.