Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर; हिंदुत्वाचा झेंडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra tour) करणार आहेत. तसेच या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नव्या दौऱ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे ‘हिंदू, गर्व, गर्जना’ नावाची यात्रा सुरू करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. ही यात्रा 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.

दहिसर मोरी भागातील १४ गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेचे नेमके मत काय आहे, त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती त्यांना मिळणार आहे. तसेच आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्वासाठी काय करत आहोत हे पटवून देण्याचे काम आमदार करतील. एकनाथ शिंदे वेळोवेळी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

मोठी बातमी : शिर्डी साई संस्थानचे ‘विश्वस्त मंडळ’ बरखास्त; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

दरम्यान, मुंबईतील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात शिंदे गटाच्या आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत यंदाच्या दसरा मेळाव्याबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र अद्याप कोणाचीही परवानगी मिळालेली नाही. या बैठकीत पर्यायी जागांचाही विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानात दसरा मेळावा घेण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शिंदे गटाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे, याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.