Take a fresh look at your lifestyle.

खुशखबर! CISF मध्ये 249 रिक्त जागांसाठी भरती, तब्बल 81 हजारपर्यंत मिळेल पगार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत एकूण 249 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. स्पोर्टस कोट्याअंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदासाठी ही जाहिरात निघाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार cisf.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सदरील भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च निश्चित करण्यात आली आहे. जर अर्ज करणारे उमेदवार हे उत्तर विभागातील असतील तर, अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 एप्रिल 2022 पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवरील अटी व नियम वाचून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा – ना लॉकअप फोडलं, ना कुलूप तोडलं, तरीही लॉकअपमधून असा पळाला चोर, पहा व्हिडिओ….

पात्रता काय?

Cisf मधून Sports कोट्यातून अर्ज करणारा उमेदवार हा किमान 12 वी पास असावा. याशिवाय त्यानं राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतलेला असणं आवश्यक आहे. हेड कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला वेतनश्रेणी 4 प्रमाणे 25500 ते 81100 रुपये पगार मिळेल.

हेही वाचा – हवामान विभागाकडून अलर्ट! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस पावसाचे

वयाची अट किती?

Cisf हेड कॉन्स्टेबलसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाचा जन्म हा 2 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2003 च्या दरम्यान झाला असावा. प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेदरम्यान रोल नंबर, प्रवेशपत्र दिलं जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची शारीरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र तपाणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.