Take a fresh look at your lifestyle.

मातीचे भांडे भेट देऊन ‘पक्षी वाचवा’ मोहीम

0

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : शहरातील नागरिकांना मातीचे भांडे भेट देऊन ‘पक्षी वाचवा’ ही चळवळ दिनेश चोरडिया यांनी सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षापासून या चळवळीला मिळालेल्या प्रतिसादामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवून आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राजवळ पक्षांना पाणी ठेवण्यासाठी नागरिकांना मातीच्या भांड्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सराफ व्यवसायिक सोमनाथ महाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नाना सारंगधर, पत्रकार अनिल पांडे, करण नवले, महेश माळवे, स्वामीराज कुलथे आदी उपस्थित होते.

चोरडिया हे गेल्या पाच वर्षांपासून पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून नागरिकांना मातीचे भांडे स्वखर्चातून भेट देतात. त्यांच्या या उपक्रमाला समाजातील दानशूरांनीही हातभार लावावा. तसेच नागरिकांनीही आपल्या अंगणात पाणी व धान्य ठेवून पक्षांच्या अन्न व पाण्याची सोय करावी असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी देवेंद्र पीडियार, गोरख गुळवे, अशोक थोरात, अनिल पीडीयार, सागर पापडीवाल, आस्मा शेख, अमित जगधने, अनिल सोमासे, खराडकर, इम्रान सय्यद, ज्ञानूभाऊ सारंगधर, गणेश टाकळकर, शैलेश राठी, गोकुळ पापडीवाल तसेच जिजामाता तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दिनेश चोरडिया यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.