Take a fresh look at your lifestyle.

हवामान बदलामुळे वातावरणात दाहकता वाढणार; येत्या काळात जगभरात उष्णतेचा प्रकोप

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगचा विपरीत परिणाम जगभरात जाणवत असून विविध देशांत वातावरणीय बदल अनुभवास येत आहे. जल वायू परिवर्तन, सरासरीपेक्षा अधिक पाऊस किंवा कमालीचे उष्णतामान यामुळे जगातील विविध देशातील नागरिक त्रस्त आहेत. हरितवायू उत्सर्जन तसेच वाढते प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. लॉकडाऊनच्या काळात जगभरातील व्यापार व सामान्य जनजीवनावर बंधने निर्माण झाल्याने विविध प्रदूषणाला आळा बसला होता परंतु लॉकडाऊन समाप्तीनंतर पुहा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होऊन वातावरणातील उष्णतामान वाढले असल्याचे दृश्य आहे. यावर्षी देशाची राजधानी दिल्लीत उन्हाळ्यामध्ये ४९.२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती.

जागतिक श्रीमंतांच्या यादीतील आठ अब्जाधिशांना ४१ अब्जाचा फटका; ‘या’ भारतीय उद्योगपतींची चांदी

सध्याच्या तापमानापेक्षा जवळपास ३० पट अधिक तापमान वर्ष २०५० येईपर्यंत अनुभवायला मिळेल असे मत जागतिक हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.हवामान खात्याच्या अहवालानुसार जगातील जवळपास ९७० देशातील सरासरी तापमान हे ३५ अंश डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात होणारे जीवाश्म इंधनाचे ज्वलन व यातून होणारे घातक वायूंचे उत्सर्जन यामुळे भारतासोबत संपूर्ण जगाला उष्णतावाढीने विळखा घातलेला आहे. सध्याची स्थिती पाहता पॅरिस करार केवळ कागदोपत्री शिल्लक उरला असून निर्धारित केलेले दिढ अंश सेल्सियस पर्यंत कमी तापमान करण्याचे ध्येय गाठता येईल का? हा यक्षप्रश्न आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजेरी लावणार

चीन सारख्या देशांनी नेहमीच वातावरण बदलांवर घेण्यात येणाऱ्या जागतिक परिषदेच्या ध्येयांना व कराराला केराची टोपली दाखवली आहे, यामुळे प्रदूषणास प्रमुखरित्या कारणीभूत देशच पळवाटा शोधात असतील तिथे अन्य देशांपासून कितपत आशा लावणार, हा देखील मुख्य मुद्दा आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.