Take a fresh look at your lifestyle.

‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा आमचा संकल्प’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरु आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात केलेल्या बंडामुळे राजकारण्यांपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वचजण गोंधळले होते. दरम्यान, कदाचित फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच अचानक सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतरच या राजकीय नाट्याला पूर्णविराम लागला असल्याचं म्हणता येईल.

Breaking News : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपच्या या तरुण आमदाराला संधी

विशेष म्हणजे, काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. माध्यमांशी बोलतांना पुढील अडीच वर्ष या सरकारसाठी महत्वाची असून नवं सरकार काय-काय कामे करेल याबाबत त्यांनी माहिती दिली. विशेष म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्त्वाची तरतूद करायची आहे. त्यांच्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातील जेणेकरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील, संपूर्ण महाराष्ट्र आत्महत्यामुक्त होईल, असा आपला संकल्प असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी निश्चित होणार; Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा

“महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच स्वप्न आणि ध्येय आमचं आहे. विकास कामे पूर्ण करायचे आहेत. मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यास मुंबईतील दळणवळण यंत्रणा सक्षम होईल. शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागातील अनेक प्रकल्प रखडलले आहेत ते प्रकल्प मार्गी लागले तर मोठ्या प्रमाणातील पाण्याचं सिंचन होईल. बळीराजा हा आपला मायबाप आहे. त्याला सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही महत्त्वाची पाऊलं उचलणार आहोत. दरम्यान, खूप मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या भवितव्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू. राज्यात मोठमोठे उद्योग येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. राज्याच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करु”, असं शिंदे यांनी सांगितलं.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

“सर्व घटकांना न्याय देण्याचं काम हाच आमचा प्रमुख अजेंडा आहे. कारण शेवटी राज्याची प्रगती हिच महत्त्वाची असते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments are closed.