Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री मंत्रालयाला देणार निरोप? दुपारी सर्व सचिवांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादानंतरही आज सकाळी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल जोरदार शक्तीप्रदर्शन करत वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये आले.

महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार! शिंदे काय निवडणार? भाजपची ऑफर की उद्धव ठाकरेंची साद?

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात, त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता मंत्रालयातील सगळ्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. अडीच वर्ष केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री आभार व्यक्त करणार आहेत. ही मंत्रालय अंतर्गत बैठक असल्यामुळे याचं प्रक्षेपण करता येणार नाही.

Breaking News : मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ला जय महाराष्ट्र; आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना (Shivsena) आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराने मला समोर येऊन सांगावं, मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. केवळ मुख्यमंत्रीपदच नाही, तर मी शिवसेना पक्षप्रमुखपदाचाही राजीनामा देण्यास तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.